
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील हॉटेल ‘कामत गोविंदा’ तसेच मुंबई गिरगाव येथील हॉटेल गोविंदाश्रमचे मालक श्रीकांत कामत यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे वय 78 वर्षे होते. प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात तीन मुले तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे. 21 मे रोजी दशक्रिया विधी तसेच उत्तरकार्य गिरगाव येथील राहत्या घरी होणार असल्याचे कामत कुटुंबीयांनी सांगितले.