श्रेयस तळपदे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आभाळमाया’, ‘अवंतिका’ आणि  ‘दामिनी’ या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. झी मराठीवरील आगामी मालिका ‘माझी-तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला  आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदेसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे.