
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डावरे यांनी संभाजी नगर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायधीश म्हणून तर मुंबईच्या शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. तसेच टाडा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश म्हणून ही काम केले आहे. त्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे खटले हातळले.


























































