
सामना प्रतिनिधी, नगर
नारळी पौर्णिमेनिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने जाहीर उपस्थिती लावली. यावेळी भाजपाचे खासदार दिलीप गांधी हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. दोघेही एकत्र आल्यामुळे नगरकरांमध्ये खळबळ उडाली असून दिवसभर याचीच चर्चा सुरू होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यानंतर भाजपचा पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदम याला घराबाहेर पडणेही मुश्कील झाले हेते, मात्र रविवारी त्याने जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्याच्यामागे कोण आहे याचा उलगडाही शिवप्रेमींना झाला आहे. यातूनच छिंदम याने पुन्हा निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू असल्यामुळे वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीस शिवद्रोही श्रीपाद छिंदमने हजेरी लावली, तर याच कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी आणि त्यांचे पुत्रही उपस्थित होते. यामुळे खासदार गांधी आणि छिंदम यांचे संबंध उघडकीस आले आहेत. या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित राहणार हे सांगण्यात आले होते, मात्र छिंदम याने अचानक हजेरी लावून आपण महापालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. यावरून आता पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. मध्यंतरी छिंदमचा पाठीराखा कोण, असे विचारले जात होते. कालच्या कार्यक्रमानंतर खासदार गांधी हेच छिंदमचा पाठीराखा असल्याचे उघड बोलले जात आहे. दरम्यान, खासदार पिता-पुत्र आणि छिंदम बंधूंचे फोटो सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल होत होते.
summary-shripad chindam spotted with dilip gandhi in a programm
























































