
सामना प्रतिनिधी। श्रीरामपूर
शहरात भर दुपारी दीड लाख रुपय किमतीचे गंठण चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उ़डाली आहे. या भामट्यांना तीन दिवसात अटक करा अशी मागणी करत शहरातील व्यापारी व नागरिक यांनी मूक मोर्चा काढला. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गुन्हेगार व पोलीस यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे चोऱ्या वाढल्या असा गंभीर आरोप नागरिकांनी केला.
शहरातील छाया विजय सोनी, शशिकला अशोक पांडे या दोन महिलांच्या गळ्यातील गंठण दुपारी ११. ३० वाजता मेन रोड वरील श्रावणी लेडीज या दुकान समोरून जात असतांना दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात चोरांनी पळवले. गंठण चोरी झाल्या नंतर शहरात घबराट पसरली. सोनी व पांडे कुटुंबीयांनी पोलिसांना गंठण चोरीची माहिती दिली. परंतु नेहमी प्रमाणे पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केले. त्या नंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संध्याकाळी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.
नगराध्यक्षा अनुराधा अधिक ,उपनगराध्यक्ष कारण ससाणे ,माझी खासदार भाऊसाहेब वाघचौरे ,बाजार समितीचे सभापती सचिन गुजर व्यापारी संघटनेचे माझी अध्यक्ष रमण मुथा , रमेश कोठारे , शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे ,भाजपचे सिरचिटणीस प्रकाश चित्ते , केतन खोरे श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्य नगर सेवक राजेंद्र पवार माझी नगर सेवक संजय चाल्लारे राजेंद्र सोनावणे आदींनी गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली .पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी गुन्हेगारीचा बिमोड करावा अशी मागणी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

































































