रिंकूला माकड चावलं होतं म्हणून तो…; शुभमन गिलने सांगितले गुपीत, पहा व्हिडिओ

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ टी-20, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हिंदुस्थान संघ आज (रविवारी) डर्बनमध्ये पहिला सामना खेळेल. बीसीसीआयने रिंकू सिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू सोबतचा संवाद आहे.

या व्हिडीओमध्ये रिंकू सिंग याने, क्रिकेटमध्ये फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. दररोज शारिरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी दररोज धावतो. तेवढ्यातच मागून शुभमन गिल याने ‘ रिंकूला माकड चावले होते त्यामुळे तो वेगाने धावतो’ असे म्हटले. त्यानंतर रिंकूने देखील हातावरील माकडाने चावलेली जागा दाखवली.

याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान रिंकू सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात संपलेल्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. रिंकूने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली.