पुण्याची सिद्धी सुस्साट राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे 

पुण्याच्या सिद्धी शिर्के हिने 64 व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकाची कमाई केली. तिने स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल क्रमांक पटकाकला. तिचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने रोड सायकलिंगमध्ये 6 किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये सुवर्णयश मिळवले होते. ट्रक सायकलिंगचे प्रकार म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू आहेत. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये सिद्धी शिर्केने 45.110 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. तामीळनाडूच्या एम. पूजा स्वेताने 47.610 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक, तर महाराष्ट्राच्या सुहानी मोरेने 52.517 सेकंद केळ नोंदवून कांस्यपदक मिळवले. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये महाराष्ट्राच्या अथर्क पाटीलने (41.680 से.) रौप्यपदक मिळवले.