बाप्पाच्या भक्तांसाठी खुशखबर, देऊळ बंद पण दर्शन मिळणार आरतीही नाही चुकणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध मंदिरांनी महत्त्वाचे पाऊल उचलत मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह देशभरातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीसिद्धीविनायक मंदिराने सर्वप्रथम स्वत:हून यासाठी पुढाकार घेत सामाजिक भान जपल्याचे समोर आले होते. मात्र मंदिर बंद असले तरी भक्तांच्या मनात असलेली हुरहूर लक्षात घेत श्रीसिद्धीविनायक मंदिर न्यासाने भक्तांना देवाचे दर्शन आणि आरती मात्र चुकणार नाही अशी व्यवस्था केली आहे. आता बाप्पाच्या भक्तांना आरती आणि दर्शन ऑनलाईन मिळणार आहे.

img-20200318-wa0013

श्रीसिद्धीविनायक मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी अत्यंत सुरळीत सुरू आहेत. त्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही, असे श्रीसिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली. भक्तांनाही दर्शन आणि आरती ऑनलाईन मिळणार असून अधिकृत फेसबुक पेजवरून मंदिरातील पूजा व आरती मिळणार आहे.

मंदिरातील पूजा आणि आरतीचे दर दिवसाचे तसेच मंगळवार, संकष्टी चतुर्थी, विनायकी संकष्टी चतुर्थीचे वेळापत्रकच मंदिर न्यासाकडून जारी करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भाविकांना फेसबुक पेज आणि यूट्युब चॅनेलवरून त्याचा लाभ घेता येणार आहे.

img-20200318-wa0014