
लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला मोठे यश मिळाले. यानंतर आता अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असून 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे (एसडीएफ) 10 आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांच्या उपस्थितीत आमदारांचा प्रवेश होईल.
सिक्किममध्ये सध्या सिक्किम क्रांतीकारी मोर्चाचे (एसकेएम) सरकार आहे आणि प्रेम सिंह तमांग हे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळत आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पवन कुमार चामलिंग यांचा पक्ष एसडीएफचे 15 आमदार जिंकले होते. यापैकी 10 आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


























































