
शुक्रवारी चांदीच्या किमतीत 6 हजार 623 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा दर प्रति किलो 2.44 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 2 हजार 419 रुपयांनी वाढल्याने आता सोने थेट 1 लाख 60 हजारांपर्यंत पोहोचले आहे. ऑगस्ट महिन्यातील अवघ्या 21 दिवसात सोने 16 हजार 639 रुपयांनी तर चांदी 26,094 रुपयांनी महाग झाली आहे.


























































