
उत्तम जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित स्किनकेअरची सवय असणे गरजेचे आहे. दिवसभरात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा हायड्रेटेड राहून नैसर्गिक चमक येते.
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱयावरील सूज कमी होते.
आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, आणि सुका मेवा यांचा समावेश करा.




























































