आधारमध्ये मोबाईल नंबर असा करा अपडेट

aadhar card

 

 तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही हे घरबसल्या तपासता येते. जर तुम्ही मोबाईल नंबर बदलला असेल किंवा जुना नंबर बंद केला असेल तर आधारवर नवीन मोबाईल नंबर अपडेट करायची प्रक्रिया सोपी आहे. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

नवीन मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा पेंद्रावर जावे लागेल. येथे तुम्हाला आधार दुरुस्ती फॉर्म दिला जाईल, जो भरावा लागेल. दुरुस्ती फॉर्ममध्ये नाव, आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल क्रमांक यासारखे आवश्यक तपशील भरावे लागतील. आता हा फॉर्म आधार सेवा पेंद्रात सबमिट करा. येथे तुमचा बायोमेट्रिक तपशील घेतला जाईल. नवीन मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट होण्यासाठी किमान 7 दिवस लागतात. यानंतर नवीन आधारकार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल