सिंधुदुर्गात कोरोनाचे 18 नवे रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 556 वर

369

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 18 कोरोनाचे रुग्ण आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 556 झाली आहे. तर आणखी 11 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोना मुक्त संख्या 387 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 161 झाली आहे. हे सक्रिय रुग्ण सध्या जिल्ह्याच्या आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 18 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात दोडामार्ग तालुक्यातील 11 रुग्ण सापडले असून यात दोडामार्ग 1, कुंब्रल 1, खनियाळे 9 रुग्णांचा समावेश आहे. देवगड तालुक्यात 3 रुग्ण आढळले असून यात देवगड किल्ला 1, जामसंडे 1, दवगड कॉलेज रोड १ रुग्णाचा समावेश आहे. रॅपिड टेस्ट 2 तर ओरोस हॉाqस्पटल येथील 2 कर्मचारयांचा समावेश समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 556 झाली आहे. यातील 376 रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला होता. आज नव्याने 11 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 387 झाली आहे. तर 161 रुग्ण सक्रीय असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 8 हजार 705 झाली आहे. आज जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 243 कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्राप्त झालेल्या नमुन्यांची संख्या 8 हजार 421 झाली आहे. अजुन 284 नमूने अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील 7 हजार 865 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 556 अहवाल बाधित आले आहेत. बाधित पैकी 387 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 8 व्यक्तिचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 161 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या