जिल्ह्यात आणखी 9 कोरोना बाधीत व्यक्ती; एकूण रुग्णसंख्या 130

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सावंतवाडी येथील मळेवाड 2, ओवळिये 1, मालवण येथील तळगाव 1, कट्टा 1, वेंगुर्ला तालुक्यातल आसोली 1, कणकवली तालुक्यातील तळेरे येथील 1 व घोणसरी येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या 130 वर गेली आहे. तर आज 5 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पर्यंत 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 2 रुग्ण मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात 105 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अद्याप 59 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. तर 2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात 81 हजार 938 नागरिक दाखल झाले आहेत.