सिंधुदुर्ग- कुणकेश्वर किनाऱ्यावर फुटताहेत उंचच लाटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा झाल्याने ठीक ठिकाणी नदी नाले ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. याबरोबरच समुद्रकिनाऱ्यावर किनारपट्टीवर भागात मुसळधार पावसाने थैमान घातले. देवगड बंदर सुरक्षित बंदर म्हणून प्रचलीत असले तरी वादळी पावसामुळे सुमद्रात उंचच उंच लाटा उसळत आहे.

प्रामुख्याने देवगड नजिकच्या मिठमुंबरी किनारपट्टीवर तसेच कुणकेश्वर किनारपट्टी वर नजीकचा बीच परिसरात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने जणू बीच समुद्राने गिळंकृत केला की काय? असे चित्र काही काळ दिसून येत आहे. तसेच श्री देव कुणकेश्वर मंदिरंनजीक उंचच उंच लाटा मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या रस्ता कमी बंधाऱ्यावर आढळत असल्याचे दिसून येत आहे. समुद्रकिनारी उंचच उंच लाटा फुटत आहेत.