
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 6 जणांचे उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदांसाठी 56 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कणकवली भाजपा विरुद्ध क्रांतिकारी विचार पक्षामध्ये लढत निश्चित झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश पारकर विरुद्ध माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यात कडवी लढत होणार आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरेसवक पदासाठी 46 जणांचे अर्ज दाखल झाले. या निवडणुकीत भाजपविरुद्ध क्रांतिकारी विचार पक्षात लढत होणार आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दाखल झालेल्या नामनिर्देशपत्रांची मंगळवारी छाननी सकाळी 11 वा. तहसील कार्यालयात होणार आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून समीर अनंत नलावडे, गणेश उर्फ बंडू सोनू हर्णे (अपक्ष), क्रांतिकारी विचार पक्षाकडून संदेश भास्कर पारकर, लोकराज्य जनता पार्टीकडून गणेश प्रसाद पारकर, संदेश पारकर, सौरभ संदेश पारकर यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
नरसेवकपदांसाठी प्रभागनिहाय उमेदवारी अर्जामध्ये प्रभाग 1 मधून तेजस दत्तात्रय राणे (क्रांतिकारी विचार पक्ष), राजेश दत्तात्रय राणे (अपक्ष), राकेश बळीराम राणे, सखाराम श्रीकृष्ण राणे (भाजप), प्रभाग 2 मधून प्रतीक्षा प्रशांत सावंत (भाजप), साक्षी संतोष आमडोसकर (क्रांतिकारी विचार पक्ष), विराज सदानंद राणे (भाजप), संजय ज्ञानदेव पवार, शिवम नारायण राणे (अपक्ष), प्रभाग 3 मधून स्वप्नील शशिकांत राणे, विराज सदानंद राणे (भाजप), सुमित मरुती राणे (क्रांतिकारी विचार पक्ष), संजय ज्ञानदेव पवार, शिवम नारायण राणे (अपक्ष), प्रभाग 4 मधून माधवी महेंद्र मुरकर (भाजप), जाई निकित मुरकर (क्रांतिकारी विचार पक्ष), श्रेया सत्यजित पारकर (अपक्ष), प्रभाग 5 मधून मेघा अजय गांगण (भाजप), स्नेहा निलेश वाळके (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 6 मधून स्नेहा महेंद्र अंधारी (भाजप), सुमेधा सखाराम अंधारी (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 7 मधून सुप्रिया समीर नलावडे (भाजप), सावी दत्तात्रय अंधारी, सोनाली विशाल कसालकर (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 8 मधून गौतम शरद खुडकर (भाजप), विठ्ठल शंकर कासले (आम आदम पार्टी), लुकेश गोविंद कांबळे (क्रांतिकारी विचार पक्ष), किशोर आनंद कांबळे (अपक्ष), प्रभाग 9 मधून मेघा महेश सावंत, मिनल राजेश राणे (भाजप), मधुरा चंद्रकांत मालंडकर (अपक्ष), रिना रविकांत जोगळे (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 10 मधून ज्योती कृष्णकुमार देऊलकर, आर्या औदुबर राणे (भाजप), शीतल रामदास माजरेकर (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 11 मधून मयुरी महेंद्र चव्हाण (भाजप), दीपिका प्रदीपकुमार जाधव (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 12 मधून मनस्वी मिथून ठाणेकर, पूजा नंदकिशोर ठाणेकर, (भाजप), प्रांजली प्रदीप आरोलकर (क्रांतिकारी विचार पक्ष),साक्षी शैलेंद्र नेरकर (अपक्ष), प्रभाग 13 मधून गणेश उर्फ बंडू सोनू हर्णे, कल्याण विठ्ठल पारकर (भाजप), जयेश विजय धुमाळे (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 14 मधून सुरेंद्र उर्फ अण्णा सुधाकर कोदे (भाजप), राधाकृष्ण उर्फ रुपेश चंद्रकांत नार्वेकर (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रभाग 15 मधून विश्वजित विजय रासम (भाजप), संकेत श्रीधर नाईक (क्रांतिकारी विचार पक्ष), सुप्रिया संकेत नाईक (अपक्ष), प्राजक्त दिलीप आळवे (अपक्ष), प्रभाग 16 मधून संजय मधुकर कामतेकर (भाजप), हिरेन संजय कामतेकर (अपक्ष), उमेश सहदेव वाळके (क्रांतिकारी विचार पक्ष), सोहम उमेश वाळके (अपक्ष), प्रभाग 17 मधून अबिद अब्दूल नाईक (राष्ट्रवादी), सुशांत श्रीधर नाईक (क्रांतिकारी विचार पक्ष), मयुरी सुशांत नाईक (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

























































