शिरोडा-वेळागर समुद्रात एकाच कुटुंबातील 8 जण बुडाले, तिघांचा मृत्यू, चौघे बेपत्ता

शिरोडा-वेळागर समुद्रकिनाऱयावर आज कुडाळ-पिंगुळी येथून पर्यटनासाठी आलेल्या मनीयार कुटुंबातील आठ जण बुडाले. या भीषण दुर्घटनेमुळे या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, यातील तिघा जणांचे मृतदेह हाती लागले असून लहान मुलीला वाचवण्यात यश आले आहे. उर्वरीत चौघा बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुडालेल्या आठ जणांपैकी तिघा जणांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले.

सुदैवाने या दुर्घटनेत एका लहान मुलीचा जीव वाचवण्यात यश आले असून तिला पुढील उपचारांसाठी शिरोडा उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मनीयार कुटुंबावर दुŠखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, बुडालेल्यांपैकी उर्वरित चार जणांचा शोध घेतला जात आहे. यात दोन तरुण आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. वेंगुर्ले शिरोडा पोलिसाकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.