सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, अधिकारी-कर्मचारी कला, क्रीडा स्पर्धा २०१८-१९ या स्पर्धेत सावंतवाडी पंचायत समिती १२५ गुण मिळवत जनरल चॅम्पियनशिपची मानकरी ठरली आहे. कुडाळ पंचायत समिती ९४ गुणांसह उपविजेती ठरली आहे. सावंतवाडीच्या महिलांनी ७६ तर कुडाळच्या महिलांनी ६५ गुण मिळविले. महिलांच्या उत्तुंग कामगिरीच्या जोरावर या पंचायत समित्यांना घवघवीत यश मिळाले आहे. २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत सिंधुदुर्गनगरीत या स्पर्धा संपन्न झाल्या. गुरुवारी रात्री शरद कृषी भवनमध्ये स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत देवगडच्या पुरुषांनी सर्वाधिक ५० तर वैभववाडीच्या पुरुषांनी ४५ गुण मिळविले. मात्र, महिला खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. परिणामी हे दोन्ही तालुके मागे पडले. कणकवली ४२, मालवण ४१, वेंगुर्ले ३१, मुख्यालय २९, दोडामार्ग १६ असे पुरुष व महिला मिळून एकूण गुण मिळाले आहेत. सावंतवाडीच्या पुरुषांनी ४९ तर कुडाळच्या पुरुषांनी २९ गुण मिळविले आहेत.

स्पर्धेतील अंतिम निकाल:- पुरुष गट – १०० मी. धावणे- सुनील कोदले ( देवगड ), रोशन चव्हाण, शिवा चव्हाण ( कुडाळ ). २०० मी धावणे- समीर राऊळ ( कुडाळ ), संतोष पेडणेकर ( वैभववाडी ), भूषण पाटील ( दोडामार्ग ).४०० मी धावणे- विजय शिंदे ( सावंतवाडी ), आदित्य पवळ ( देवगड ), सर्जेराव मिसाळ ( वैभववाडी ). ८०० मी धावणे- कन्हेया फाले ( मुख्यालय ), धनंजय इंगळे ( वेंगुर्ले ), अमोल कोळी ( सावंतवाडी ). उंच उडी- विजय शिंदे ( सावंतवाडी ), नितीन सावंत ( सावंतवाडी ), नारायण गावडे ( कुडाळ ). लांब उडी- अंकुश जंगले ( देवगड ), आशुतोष पावले ( वेंगुर्ले ), आत्माराम गावडे ( मुख्यालय ). गोळा फेक- पांडुरंग होंडे ( सावंतवाडी ), राहुल गावडे ( वैभववाडी ), सचिन घाडी ( कणकवली ). थाळी फेक- विजय म्हस्के ( वेंगुर्ले ), अमित देसाई ( कुडाळ ), अमोल पाटील ( सावंतवाडी ). भाला फेक- सुहास रेडेकर ( वेंगुर्ले ), राजेंद्र चौधरी ( मालवण ), बाबासाहेब कोलते ( वैभववाडी ). बॅडमिंटन सिंगल- बापू सावंत ( कणकवली ), हनुमंता आखाडे ( मालवण ). बॅडमिंटन डबल- लक्ष्मण पावसकर व महेश हेडे ( कणकवली ), श्री भाबुरे व मेस्त्री ( मुख्यालय ). कॅरम सिंगल- संतोष बनसोडे ( मालवण ), आनंद पिसे ( वैभववाडी ).कॅरम डबल- राजन खराबे व अर्जुन रणशूर ( सावंतवाडी ), मुकुल सातार्डेकर व शंकर वजराटकर ( वेंगुर्ले ). बुद्धिबळ- प्रदीप पाटील ( वैभववाडी ), दीपक ठाकरे ( मालवण ). कबड्डी- देवगड पंचायत समिती, वैभववाडी पंचायत समिती. खो-खो- वैभववाडी, देवगड. हॉलिबॉल- देवगड, सावंतवाडी. लंगडी- सावंतवाडी, मुख्यालय. रस्सीखेच- वैभववाडी, कुडाळ. क्रिकेट- देवगड, कुडाळ.

महिला गट:- १०० मी धावणे- अजिता लोके ( मालवण ), रेश्मा वरसकर ( वेंगुर्ले ), आशालता कोरगांवकर ( मालवण ), २०० मी धावणे- नेहा अणसुरकर ( कुडाळ ), स्वाती पाटील ( सावंतवाडी ), जयश्री दोडके ( कुडाळ ). ४०० मी धावणे- फुलवंती वसावे ( कणकवली ), सदिच्छा कसालकर ( कुडाळ ), सुप्रिया गवस ( सावंतवाडी ). उंच उडी- शलाका केरकर ( सावंतवाडी ), शमिका घाडीगांवकर ( मुख्यालय ), संध्या सानप ( सावंतवाडी ). लांब उडी- शमिका घाडीगांवकर ( मुख्यालय ), गौळण राठोड ( कुडाळ ), फुलवंती वसावे ( कणकवली ). गोळा फेक- राधिका परुळेकर ( कुडाळ ), मनाली कोरगांवकर ( सावंतवाडी ), प्राची गवस ( दोडामार्ग ). थाळी फेक- मनाली कोरगांवकर ( सावंतवाडी ), रेश्मा वरसकर ( वेंगुर्ले ), संजना करंगुटकर ( वेंगुर्ले ). भाला फेक- शुभांगी तुळसकर ( सावंतवाडी ), प्राची गवस ( दोडामार्ग ), पूनम खोराटे ( दोडामार्ग ). बॅडमिंटन सिंगल ( स्नेहल बेलसरे ( मालवण ), सुकेशनी लोकडे ( कुडाळ ). बॅडमिंटन डबल- स्नेहल बेलसरे व युगंधरा तेंडोलकर ( मालवण ), पूनम खोराटे व श्रीम पेडणेकर ( दोडामार्ग ). कॅरम सिंगल- प्रभात पाताडे ( कणकवली ), रसिका तांबे ( कणकवली ). कॅरम डबल- प्रभात पाताडे व शीतल कदम ( कणकवली ), श्वेता देसाई व लतिका गावडे ( सावंतवाडी ). बुद्धिबळ- पूनम हजारे ( मालवण ) साधना सूर्यवंशी ( कुडाळ ). कबड्डी- कुडाळ, सावंतवाडी. खो-खो- सावंतवाडी, कुडाळ. लंगडी- सावंतवाडी, कुडाळ. रस्सीखेच- सावंतवाडी, कुडाळ. क्रिकेट- कुडाळ, सावंतवाडी.