
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य याने आपल्या आवाजाची जादू दाखवून बराच काळ झाला लोटला तरी त्याची सुमधूर गाणी आजही लोकांना भावतात. आजही लोकं त्याच्या गाण्यांची दिवाणी आहेत. एका मुलाखतीमध्ये अभिजीतने म्हणाला की, मी शाहरूखसाठी गाणी गायलो आणि त्याला सुपरस्टार बनवलं. तसेच जोपर्यंत मी शाहरूखसाठी गाणी तोपर्यंत तो सुपरस्टार होता, असे अभिजीत म्हणाला.

अभिजीत यावेळी म्हणाला की, मी माझ्या आवाजाने शाहरूखला सुपरस्टार बनवलं. जोपर्यंत मी शाहरूखसाठी गाणी गात होतो तोपर्यंत तो सुपरस्टार होता. मी त्याच्यासाठी गाणी गाणे बंद केले आणि तो ‘लुंगी डान्स’वर येऊन ठेपला. तसेच यावेळी अभिजीतने हे देखील स्पष्ट केलं की शाहरूखसाठी गाणी गाण्याचे का बंद केलं. शाहरूख खानच्या गाण्यांना आवाज न देण्यामागे एक छोटंसं कारण आहे. ‘मै हू ना’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या सेटवरील स्पॉट बॉयपासून ते सर्वांना याचे क्रेडीट देण्यात आले, परंतु गायकाचं काय? असा सवाल अभिजीतने उभा केला.
तसेच तो पुढे म्हणाला की, असाच प्रकार पुन्हा एकदा ओम शांती ओम या चित्रपटादरम्यानही झाला. या चित्रपटातील धूम ताना या गाण्यासाठी मी आवाज दिला पण तसं दाखवण्यात आलं नाही. यामुळे माझा आत्मसन्मान दुखावला गेला. मी स्वत: गाण्याशी माझे नाव जोडण्यास का सागू? असेही तो म्हणाला. विशेष म्हणजे अभिजीत स्वत:ला हिंदुस्थानी म्यूझीक इंडस्ट्रीचा भाग मानतो परंतु बॉलिवूडचा नाही.



























































