अर्जुन कपूर बनला खलनायक

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. ‘सिंघम अगेन’मध्ये अर्जुन कपूर नायक नसून खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याचा रक्तबंबाळ खलनायक लूक दिसत आहे. या नव्या रूपाबद्दल अर्जुन म्हणतो, ‘इशकजादे, औरंगजेब यांसारख्या सिनेमात नकारात्मक छटा असलेल्या व्यक्तिरेखा साकारून मी इंडस्ट्रीत माझ्या करीअरची सुरुवात केली आणि इतक्या वर्षांनंतर मी पुन्हा सिंघममध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. वेगळय़ा भूमिकेबद्दल आदित्य चोप्रा आणि रोहित शेट्टी यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे.

अर्जुन पुढे म्हणाला, ‘मोठय़ा पडद्यावर प्रयोग करावे असे मला वाटायचे. तशी संधी या भूमिकेने मला दिलेय. प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहायचे असते. ‘सिंघम अगेन’मध्ये पोलिसांच्या कट्टर शत्रूची भूमिका करणे ही माझ्यासाठी एक रोमहर्षक संधी आहे.’