बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ विरुद्ध ‘पुष्पा 2’

 

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची सध्या चर्चा रंगली आहे.  येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. त्याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ आणि ‘पुष्पा 2’ यांच्यात टक्कर बघायला मिळाली असती. मात्र ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण न झाल्याने त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘सिंघम अगेन’  दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

सिंघम अगेनमध्ये रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत   आहेत. याशिवाय अर्जून कपूर चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

रोहित शेट्टीची टीम यावर्षी दिवाळीतसिंघम अगेनप्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. तसे झाले तर दिवाळीत  ‘भूल भुलैया 3’ आणिसिंघम अगेनची बॉक्स ऑफिस स्पर्धा पाहायला मिळेल.