सिन्नर – तळ्यात बुडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे शुक्रवारी अकरावर्षीय मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे ब्राह्मणवाडे गावावर शोककळा पसरली आहे.

ब्राह्मणवाडे येथील गौरव कल्याण गाडे (11) हा शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास आई व शेजारील महिला यांच्यासोबत गावातील तळ्यावर गेला होता. तळ्यात अंघोळीसाठी उतरलेला गौरव पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागला. ते पाहून आईने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, तिही बुडू लागली. इतर महिलांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले.

गौरवला उपचारासाठी नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी काल सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.