
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागातील काही गावांत आंदोलन सुरू होते. त्यानंतर ‘कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या’ अशा मागणीचा ठराव करण्याचा अगाऊपणा करत 11 ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, आता सहा गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव मागे घेतला आहे. दरम्यान, ठरावाचा अजेंडा काढणाऱया त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा परिषदेला दिल्याची माहिती आहे.


























































