कौशल्य आधारित अभ्यासक्रमासाठी के. जे. सोमैया खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचा पुढाकार

आदरातिथ्य आणि बांधकाम उद्योगात बहु-कुशल तंत्रज्ञांची मागणी वाढत आहे. के. जे. सोमैया खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगाने एचव्हीएसी, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगमधील मल्टी स्किल टेक्निशियन कोर्सच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. 11 महिन्यांच्या या अभ्‍यासक्रमामध्‍ये पाच महिने वर्गातील अध्यापन आणि नामांकित हॉटेल्स व रुग्णालयात सहा महिन्यांची इंटर्नशिप यांचा समावेश आहे.

हाअभ्यासक्रम इलेक्ट्रिकल्स, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आणि प्लंबिंग याबाबतची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यात कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि स्वच्छतेसह प्लंबिंग, इलेक्ट्रिकल सिस्टम्‍स, एअर-कंडिशनिंग, देखरेख आणि बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टमचे नियंत्रण व दुरुस्तीचे मूलभूत व प्रगत अभ्यास याचा समावेश आहे. पेड इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना मशीनवर काम करण्याची क्षमता वाढविण्यासोबत त्यावरील कार्यपद्धती समजून घेत रोजगारसंदर्भातील व्यावहारिक कौशल्ये शिकण्याची संधी मिळणार आहे.

के. जे. सोमैया खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या अभ्‍यासक्रमादरम्‍यान प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्‍या पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, वर्ग, उपकरणे, संगणक, इंटरनेट कनेक्शन पुरवणार आहे. प्रशिक्षित उमेदवारांपैकी किमान 80 टक्‍के उमेदवारांना रोजगार मिळवून देण्‍याची जबाबदारी संस्‍था घेणार आहे. तर उर्वरित 20 टक्‍के उमेदवारांची काळजी कोटक एज्‍युकेशन फाऊंडेशन घेणार आहे.

अभ्‍यासक्रमामधील समाविष्‍ट प्रशिक्षण खर्चाला कोटक एज्‍युकेशन फाऊंडेशन निधीसाह्य करणार आहे. प्रशिक्षण केंद्रापासून 4 ते 5 किमी अंतरापर्यत राहणाऱ्या विद्यार्थ्‍यांना प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. नॉन-डोमेन क्षेत्रांमध्‍ये 200 तासांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात कामासाठी सुसज्‍ज मॉड्यूल, जीवन कौशल्‍ये, मूलभूत बोलले जाणारे इंग्रजी आणि मूलभूत आयटी प्रशिक्षणासह एनआयआटी सर्टिफिकेशनचा समावेश आहे.

या अभ्‍यासक्रमाबाबत के. जे. सोमैया खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य श्री. शाजी मॅथ्‍यू म्‍हणाले, ”आजच्‍या युगात व्‍यावसायिक शिक्षण व जीवन कौशल्‍ये अत्‍यंत महत्त्वाची आहेत आणि त्‍यांच्‍याशिवाय तग धरणे अशक्‍य होऊ शकते. आम्‍हाला कोटक एज्‍युकेशन फाऊंडेशनसोबत सहयोगाने मल्‍टी स्किल टेक्निशियन कोर्स प्रशिक्षणाची घोषणा करताना आनंद होत आहे. विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षणासह सक्षम करण्‍यावर आणि व्‍यावसायिक जीवनामध्‍ये प्रगती करण्‍यासाठी आवश्‍यक कौशल्‍यांसह प्रशिक्षण देण्‍यावर आमचा विश्‍वास आहे.” वंचित विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य-आधारित शिक्षण व प्रशिक्षण देण्‍याच्‍या मनसुब्‍यासह वर्ष १९८८ मध्‍ये के जे सोमैया खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेची स्‍थापना करण्‍यात आली.

कोटक एज्‍युकेशन फाऊंडशेन विविध शैक्षणिक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून वंचित कुटुंबांमधील तरूणांना सक्षम करते, तसेच रोजगारक्षम कौशल्‍यांसह सुसज्‍ज करते. ज्‍यामुळे ते प्रगती करण्‍यासोबत स्थिर उदरनिर्वाह प्राप्‍त करतील आणि सन्‍मानासह जीवन जगू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या