
स्कोडा ऑटो इंडियाच्या विक्रीतील दमदार वाढ मार्च 2022 मध्येही कायम राहिली आहे. स्कोडाने गेल्या महिन्यात तब्बल 5,608 युनिट्सची विक्रमी विक्री केली आहे.

हिंदुस्थानात दोन दशकांच्या इतिहासात स्कोडा ऑटोने एकाच महिन्यात केलेली ही आजवरची सर्वाधिक विक्री आहे.

मागील वर्षीच्या, मार्च 2021 मधील कंपनीने 1,159 युनिट्सच्या विक्री केली होती. त्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये पाच पट वाढ झाली आहे. तत्पूर्वी जून 2012 मध्ये 4,923 गाड्या विक्रीचा सर्वोच्च रेकॉर्ड होता.

2022 च्या पहिल्या तिमाहीत स्कोडा ऑटो इंडियाने इतर कोणत्याही तिमाहीच्या तुलनेत अधिक गाड्या विकल्या. जानेवारी ते मार्च 2022 या काळात या ब्रँडने ग्राहकांना 13, 120 गाड्या विकल्या.

2021 मध्ये याच काळात स्कोडा ऑटो इंडियाने 3,016 गाड्या विकल्या होत्या. म्हणजेच यंदा यात चार पट वाढ झाली आहे.



























































