गूगल म्हणतं सलमान सगळ्यात वाईट हिंदुस्थानी अभिनेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दबंग सलमान खान बॉलिवुडचा सुपरस्टार आहे हे जगजाहीर आहे. नुकताच त्याचा रेस -३ चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान गल्लाही जमवत आहे. एवढ्या सगळ्या कूल वातावरणात गूगलने सर्च लिस्टमध्ये सलमान हा सगळ्यात वाईट हिंदुस्थानी अभिनेता असल्याचं नमूद केल्याचं समोर आलं आहे. गूगलवर Worst Indian Actor नावाने सर्च केल्यावर Worst Bollywood Actor मध्ये सलमानच नाव झळकत असल्याचा एकाने व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल केला आहे.

याआधी गूगलवर हिंदु्स्थानचे पहिले पंतप्रधान सर्च केल्यावर जवाहरलाल नेहरू यांच नाव यायचं. पण फोटो मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत होता. एवढेच नाही तर हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री सर्च केल्यावरही माजी मंत्र्यांचे फोटो दिसत होते.