माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना मुक्कामाचे नो टेन्शन!मध्य रेल्वे बीओटी तत्त्वावर

माथेरानला फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मुक्कामाचे आता टेन्शन असणार नाही. पर्यटकांची हॉटेलधारकांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसप्रमाणेच आपल्या माथेरान स्थानकात स्लीपिंग पॉड्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना किफायतशीर दरात या पॉडमध्ये मुक्काम करता येणार आहे. सदरचे पॉड्स बोओटी तत्त्वावर रेल्वे उभारणार आहे.

मुंबईकरांसाठी सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण अशी माथेरानची ओळख असून दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देतात. मात्र येथे हॉटेलची संख्या मर्यादित असल्याने मुक्काम करणाऱया पर्यटकांच्या खिशाला मोठी झळ बसते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने येथे पॉड्स विकसित करण्याची योजना तयार केली असून त्याच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सदर निविदा नॉन-फेअर रेव्हेन्य मॉडेलअंतर्गत असून त्या लवकरच 25 सप्टेंबर रोजी खुल्या केल्या जाणार आहेत. रेल्वेची सदर स्लीपिंग पॉड्स सेवा सुरू झाल्यानंतर पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.