स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर हल्ला, अज्ञाताने झाडली गोळी

युरोपियन देश असलेल्या स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रॉबर्ट फिको यांना जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सदर घटना स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हा पासून 150 किलोमीटर उत्तर-पूर्वेकडे असणाऱ्या हैंडलोवा शहरामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर गोळी मारण्यात आली. पंतप्रधान रॉबर्ट फिको हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर नागरिकांशी संवाध साधत होते. यावेळी अज्ञात व्यक्तिने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर पंतप्रधानांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.