ओडिशात चार्टर्ड विमान कोसळले, सहा प्रवासी जखमी

ओडीशातील राउरकेला येथे एक चार्टर्ड विमान कोसळले असून या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. विमानात पायलटसह नऊ प्रवासी होते. हे विमान इंडिया वन एअर कंपनीचे होते.

हे विमान भुवनेश्वरवरून राऊरकेला येथे जात होते. विमानाने दहा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विमानात काहीतरी बिघाड असल्याचे कॅप्टनव नवीन काडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तर यांना जाणवले. त्यांनी विमानाचे तत्काळ लँडिग करण्याचा प्रयत्न केला. मात्र विमान जमिनीवर आदळले. या अपघातात दोन्ही पायलटसह सहा जण जखमी झाले आहेत.