
सोप्या गोष्टी
- पनीर करताना एक लिटर दुधाला उकळी आल्यावरच एका लिंबाचा रस गाळून टाकून दूध पूर्ण नासल्यावरच गॅस बंद करावा.
- पनीरच्या वड्या करण्यासाठी त्यात एक चमचा कॉर्नफ्लोवर किंवा मैदा टाकून मळून घ्यावे व घट्ट बसेल अशा डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे.
- वरणाला फोडणी दिल्यानंतर त्यात मसाला व पाणी टाकल्यावर कढीपत्ता देठासकट टाकावा. छान चव येते.
- फ्लॉवर आणि वाटाण्याची भाजी करताना त्यात पावभाजी मसाला घालावा. चव छान लागते.
- शिळा भात राहिला असल्यास फोडणीत कांद्यामध्ये पावभाजी मसाला टाकला की तवा पुलावासारखी चव येते.
- भजी कुरकुरीत करण्यासाठी भजीच्या पिठात भात बारीक करून टाकावा.
- शिळा भात इडली डोशाच्या पिठातही वाटून टाकता येतो.
- डाळ, भाताचा कुकर झाला असेल तर झाकण थंड झाल्यावर डाळ बाजूला काढून शिळय़ा पोळ्या कुकरमध्ये झाकण लावून ठेवाव्यात. पोळय़ा नरम गरम लुसलुशीत होतात. वाफ अजिबात धरत नाही.
- ओल्या खोबऱ्याच्या चटणीला दही नसेल तर एक लिंबू पिळावे.



























































