
टेक कंपनी नथिंगने हिंदुस्थानात आपला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन नथिंग फोन 3 लाँच केला आहे. या फोनची किंमत 79 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये एक एआय बटनसुद्धा दिले आहे. नथिंग स्मार्टफोन हा थेट आयफोनला टक्कर देऊ शकतो. या फोनमध्ये बाकीचे फिचर्ससुद्धा तगडे दिले आहेत.