
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता या बातम्यांना पूर्णविराम मिळाला असून स्वत: स्मृतीने याबाबत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींची सार्वजनिक आयुष्यात चर्चा करत नाही.पण एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ती म्हणजे माझं लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल, असे स्मृतीने म्हटले आहे.

टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात होते. यानंतर या लग्नाबाबत तसेच स्मृती व पलाशच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. या प्रकरणावर आता स्मृतीने मौन सोडले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं.माझ्या वैयक्तिक गोष्टींची सार्वजनिक आयुष्यात चर्चा करत नाही.पण एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ती म्हणजे माझं लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या पद्धतीने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी, असे स्मृतीने म्हटले आहे.
View this post on Instagram
स्मृतीने दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेनंतर आता संगितकार पलाश मुछाल यानेही एक पोस्ट शेअर केली आहे.मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गोष्टी माझ्यासाठी सर्वात पवित्र होत्या त्याबद्दल लोंकाना अशाप्रकारे निरर्थक गोष्टी बोलताना पाहून मला धक्का बसला आहे. हा माझ्या आयुष्यातील खूप कठीण काळ आहे. मला असं वाटत एक समाज म्हणून आपण दुसऱ्याबद्दल बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या शब्दांनी कुणाचं मन किती दुखू शकतं. ते तुम्हाला कधीच समजणार नाही. त्यामुळे मी आणि माझी टीम अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो असे त्य़ाने म्हटले आहे.



























































