सरकारचा पैसा आहे… आपल्या बापाचं काय जातं?

सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं वादग्रस्त वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी अकोल्यात केलं.

मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतरही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं थांबलेली नाहीत. विशेष म्हणजे शिरसाटांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना याच कार्यक्रमात सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला.