
हैदराबाद येथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि सामाजिक कार्यकर्ता सैयद अब्दाहु कशफ याला अटक करण्यात आली आहे. त्याने भाजपचे माजी आमदार टी. राजा सिंह यांच्या विरोधातील सर तन से जुदा या घोषणेला समर्थन दिलं होतं.
भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर देशभरात विरोधाचा डोंब उसळला होता. अनेक मुस्लीम संघटनांनी राजा यांच्या विधानाला विरोध केला होता. या वक्तव्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशा अर्थाची सर तन से जुदा ही धमकी देखील देण्यात आली होती.
राजा यांच्या विरोधातील एका आंदोलनात सैयद अब्दाहु कशफ हा देखील सहभागी झाला होता. त्याने देखील या घोषणेला समर्थन दिलं होतं. त्यामुळे त्याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.

























































