Video – रडवणारा कांदा सोशल मीडियावर हसवतोय!

608

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव नवनवीन उच्चांक गाठत आहेत. कांदा शंभरीच्या पार पोचल्याने ग्राहकांवर रडायची वेळ आली आहे. मार्केटमध्ये रडवणारा कांदा सोशल मीडियावर मात्र हसवताना दिसत आहे. कांद्यावर केले जाणारे जोक्स, मिम्स मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहेत. टिकटॉकवरही मजेशीर व्हिडियो तयार केले जात आहेत. त्यामुळे काही क्षण का होईना कांदा महागाईच्या दुखावर विनोदाची फुंकर मारताना दिसत आहे.

सोशल मीडिया आणि मिम्स हे समीकरण आता चांगलंच जमून आले आहे. त्यामध्ये आता गेल्या काही दिवसापासून महागलेला कांदा या विषयाची भर पडली आहे. मेरे करन-अर्जुन आयेंगे, दो किलो प्याज लायेंगे’… कांद्याच्या भाववाढीकरून सोशल मीडियावर व्हायरल झालेला मिम्स सध्या नेटिजन्सना खळखळून हसवत आहे. केवळ हा एकच डायलॉग नव्हे तर हिंदी चित्रपटांतील अन्य गाजलेले डायलॉगलाही कांद्याशी जोडले जात आहे. राजकुमार यांचा ‘जिनके घर शीशे के होते हैं…’ तसेच प्राण यांचा ‘जंजीर’मधल्या गाजलेल्या संवांदांचा समावेश आहे.

कांदा किती महागलाय हे सांगण्यासाठी अनेक टिकटॉक व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. कांदा एकढा महागला की कांदा आता भाजीला नुसताच दाखवला जातो आहे. कांदा एवढा मौल्यवान झालाय की कांदा आता तिजोरीत ठेवला जाऊ लागले आहेत. जेवताना ज्यांना कच्चा कांदा खायची आवड आहे ते आता फक्त कांद्याचा वास घेऊनच जेवत आहेत. कांद्याने ग्राहकांचे कांदे केले असले तरी हा कांदा सोशल मीडियावर तुफान लाईक्स आणि हिट्स गोळा करत आहे. ओनियन बँक ऑफ इंडिया… इथे कांद्यासाठी कर्ज मिळेल, अशा आशयाचे विनोदही फॉरवर्ड होत आहेत.

व्हायरल होत असलेले मिम्स
– मेरे करन-अर्जुन आयेंगे, दो किलो प्याज लायेंगे
– जिन के घर प्याज के सलाद होते हैं, को बत्ती बुझा कर खाना खाते है
– चिनॉय सेठ, प्याज छोटे बच्चोंके खेलने की चीज नहीं, कट जाए तो आसू निकल आता है
– दे दे प्याज दे प्याज दे प्याज दे रे, हमें प्याज दे
– प्याज बिना चैन कहां रे, सोना नही चाँदी नही, प्याज ही मिला…

आपली प्रतिक्रिया द्या