
नागपूरचा डॉली चायवाला सुपरस्टार बनला आहे. इन्स्टाग्राम रील्स, यूटय़ुब शॉर्टस् आणि व्हायरल व्हिडीओ यांमुळे तो आज सोशल मीडियाचा स्टार बनला आहे. त्याच्या चहा देण्याच्या स्टाईलने अगदी परदेशी व्लॉगर्सचेही लक्ष वेधून घेतले आहे.
आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. ‘डॉली चायवाला’चे नवीन स्टोअर आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचा पहिला लूक पाहताच चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. साध्या टपरीवरून सुरू झालेला हा प्रवास आता आलिशान स्टोअरपर्यंत पोहोचला आहे. मोठय़ा काचा, लायटिंग, मॉडर्न इंटेरियर, बाहेर मोठय़ा भिंतीवर चमकदार इंग्रजीत अक्षरांत लिहिलेला डॉली शब्द या सर्वांमुळे ‘डॉली चायवाला’ स्टोअरचा लूक एकदम खुलला आहे. त्याचा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे.



























































