
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिम दिल्लीचे खासदार (भाजप) डॉ. उदित राज यांनी केलेल्या एका विधानामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. राज यांनी मंदिरातील संपत्ती काय कामाची आहे. तिला विकून टाका असे म्हटले. यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना फैलावर घेतले. फक्त हिंदू धर्माच्याच का? मुसलमानांच्या मशिदी, मदरसे आणि ख्रिश्चनांच्या चर्चमधील संपत्तीबाबत आपले काय मत आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी उदित राज यांना केला. तर काहींनी त्यांना स्वत:ची संपत्ती हिंदुस्थानी लष्करासाठी दान करावी असाही सल्ला दिला.
काय आहे प्रकरण?
भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्वीटमुळे हा वाद सुरू झाला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘केरळच्या पद्मनाभ, सबरीमाला आणि गुरुवायूर मंदिरातील सोनं आणि इतर संपत्ती विकून टाकली तर पुरातून बाहेर येण्यासाठी लागणाऱ्या 21 हजार कोटींपेक्षा पाचपट पैसा जमा होईल. नागरिकांनी रस्त्यावर उतरून याची मागणी करायला हवी. मंदिरातील संपत्ती काय कामाची आहे?’
केरल के पद्मनाभ,सबरीमाल और गुरुवायुर मंदिरों के सोने और सम्पत्ति को बेच दिया जाए तो बाढ़ की मार से निकलने के लिए 21 हज़ार करोड़ से पाँच गुणा ज़्यादा है । जनता को सड़कों पर निकल करके माँग करनी चाहिए । मंदिरों में पड़ी हुई सम्पत्ति किस काम की है ?
— Dr. Udit Raj, MP (@Dr_Uditraj) September 11, 2018
भाजप खासदाराच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी आकांडतांडव केला. नेटकऱ्यांनी त्यांना प्रतिप्रश्न करत उत्तर देण्यास सांगितले.


























































