सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्डयावर छापा, 17 जणांविरूद्ध कारवाई, सव्वा पाच लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुगार अड्डयावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने 17 जणांविरूद्ध कारवाई करीत 5 लाख 26 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई औंध परिसरातील न्यू रिव्हर साईड परिसरात करण्यात आली.

विजससिंग दलपतसिंग चौहान, सुरज ब्रिटीश साळुंखे, इश्वर बाबाराव दामोदर, फारूख रौफ खान, संकेत नंदू कदम, सचिन सुभाष सिताफळे, मुगलआप्पा बसप्पा कानकुर्ती, नागेश त्र्यंबक लादे, झुलकर मजहर खान, प्रमोद रमेश धेंडे, नवल नहाडे, चंद्रकांत कबीर जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. इतर पाचजण पसार झाले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर, शिंदे, मोहिते, कांबळे, बरडे, ढापसे यांनी केली.