भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी धोक्यात, जात पडताळणी समितीचा निर्णय जाहीर

1298
bjp-mp-dr-jaysiddheshwar

सोलापूर लोकसभेचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा ‘बेडा जंगम’ जातीचा दावा जात पडताळणी समितीने अमान्य केला आहे. जात समितीने दिलेल्या निर्णयाचे कागदपत्र तक्रारदारांकडून पत्रकारांसमोर जाहीर करण्यात आले आहेत. याआधी जात पडताळणी समितीने हा निर्णय राखून ठेवला होता.

याआधी 15 फेब्रवारी 2020 रोजी यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली होती. मूळ कागदपत्रे सादर न केल्याने खासदारांनी दाखल केलेले 12 अर्ज पडताळणी समितीने फेटाळले होते. जात प्रमाणपत्र समितीने अर्ज फेटाळल्यामुळे भाजपात खळबळ उडाली होती. तक्रारदारांनी खासदार महास्वामींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असतानाच डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणूक अर्जाबरोबर दाखल केलेला बेडा जंगम जात प्रमाणपत्रावर दोघा उमेदवारांनी आक्षेप घेत तक्रारही दिली होती. या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रारीची सुनावणी पूर्ण झाली. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी समर्थनार्थ 12 अर्ज सादर केले होते, मात्र पडताळणी समितीने खासदारांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत संशय व्यक्त केला होता. सुनावणीदरम्यान खासदारांना वेळोवेळी मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देऊनही सादर न केल्याने त्यांचे 12 ही अर्ज फेटाळून देत निर्णय राखून ठेवला होता. अखेर सोमवारी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निर्णय देण्यात आला आहे. खासदार महास्वामींच्या विरोधात अर्ज दाखल करणारे प्रमोद गायकवाड यांनी डॉ. महास्वामी यांनी बोगस प्रमाणपत्र जोडून निवडणूक लढविली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

dr-jaysiddheshwar-result

जात प्रमाणपत्र फेटाळल्यामुळे महास्वामींची खासदारकी धोक्यात आली असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. आता न्यायालय काय निकाल देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या