
टप्पा अनुदानावरील सोलापूर जिह्यातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील जवळपास साडेतीनशे शिक्षकांना अद्यापि शालार्थ आयडी मिळालेला नाही. शिक्षण खात्यातून आवक-जावक नोंदवह्या गायब झाल्याने काहींच्या मान्यताच संशयाच्या भोकऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या पर्यायी मार्गातून शालार्थ आयडी देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे.
फेबुवारी 2013 पूर्वी ज्या शिक्षकांच्या मान्यता आहेत, त्यांना ‘टीईटी’ बंधनकारक नाही. परंतु, त्यानंतरच्या प्रत्येक शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्या कारणासाठीदेखील काहीजणांचा शालार्थ आयडी अडकला आहे. सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने पोलिसांत एफआयआर दाखल करून उपसंचालकांकडे शालार्थ आयडीसाठी पाठकिलेल्या 298 पैकी जवळपास 100 जणांना शालार्थ आयडी मिळाला आहे. परंतु, आणखी पावणेदोनशेहून अधिक जणांचे सहा मुद्दे जुळत नाहीत. त्यादृष्टीने आता त्रुटींच्या पूर्ततेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव पाठवून दिल्याचे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, 12 ते 15 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीदेखील अनेक शिक्षकांना बिनपगारीच काम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे 2022-23ची संचमान्यता पूर्ण झाली नसल्यानेही खासगी प्राथमिक शाळांमधील 87 शिक्षकांची कार्यवाही थांबली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची बिंदुनामावली अंतिम मान्यतेसाठी राज्य मागासवर्गीय कक्षाला पाठविली आहे. एक महिन्यापासून प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरवले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी त्यातील त्रुटींची पूर्तता केली आहे. आता पुढील आठवडय़ात ती बिंदुनामावली अंतिम होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षण खात्यातून आवक-जावक नोंदवह्या गायब
शालार्थ आयडीसाठी प्रलंबित काही प्रकरणांत आवक व जावक नोंदवह्यातील नोंदणी क्रमांक व मान्यतेवरील क्रमांक वेगवेगळा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी प्राथमिक शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा विषय मार्गी लाकण्याची जबाबदारी आता महापालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जाकीर यांच्याकर सोपविण्यात आली आहे. आता त्यासंदर्भातील कार्यकाही हाती घेण्यात आली असून, काही दिवसांत हा विषय मार्गी लागू शकतो. तत्पूर्वी, संबंधित शिक्षकांच्या मान्यता व त्यांच्या मान्यतेच्या नोंदी असलेल्या आवक-जावक वह्या नसल्याने पुन्हा पोलिसांत एफआयआर कराका लागणार आहे.




























































