सोलापुरात नगरसेकवाच्या पत्नीचे दागिने चोरणारी महिला जेरबंद; पावणेतीन लाखांचा ऐवज हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सराफ बाजारात नगरसेवकाच्या पत्नीचे दागिने चोरणाऱया एका महिलेला अटक करण्यात आली असून, पावणेतीन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रेखा भरत साळुंके असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. कविता आनंद चंदनशिवे (रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ) असे नगरसेवकाच्या पत्नीचे नाव आहे.

कविता चंदनशिवे या सराफ बाजारात आलेल्या असताना त्याच्या पर्समधून सोन्याच्या बांगडय़ा चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, संशयावरून रेखा साळुंके या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने मुलीला पाठवून दागिने चोरी केल्याचे कबूल केले. तिच्याकडून चोरीतील 2 लाख 76 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.