सोलापूरच्या उपमहापौरांना अटक, एकच फ्लॅट अनेकांना विकल्याचा आरोप

3055

सोलापूर महापलिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना शुक्रवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. काळे व त्यांच्या साथिदारांना एकच फ्लॅट अनेकांना विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. काळे आणि त्यांच्या साथीदारांनी एकच फ्लॅट अनेकांना विकल्याची प्राथमिक माहिती आहे. या गुन्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सांगवी पोलीस ठाण्याचे पथक सोलापुरात दाखल झाले. विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर राजेश काळे यांना त्यांच्या घरातून अटक केली आहे. काळे यांनी एक फ्लॅट दोघांना तर एक प्लॉट चौघांना विकल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या