नवीन ऑर्केस्ट्रॉ बारला परवानगी नाहीच, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नवीन प्रस्ताव नाकारले

ऑर्केस्ट्रा बारसाठी पोलिसांकडून परवानगी मिळवायची आणि त्याच्या नावाखाली डान्सबार किंवा अन्य अवैध प्रकार सुरू करायचे, हा पायंडा हेरून सोलापूर पोलिसांनी आता नवीन ऑर्केस्ट्रा बारला परवानगी देणे बंद केले आहे. ग्रामीणमधील नव्या एका बारला परवानगी नाकारली असून, तीन बारचे नूतनीकरण होऊ नये, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असून, दोन बारच्या नूतनीकरणापूर्वी माहिती मागविली आहे.

सोलापूर शहरात सध्या सहा, तर ग्रामीणमध्ये आठ ऑर्केस्ट्रा बार सुरू आहेत. त्यांना प्रत्येक वर्षी नूतनीकरण करून घेणे बंधनकारक आहे. त्यांची वेळ रात्री साडेबारापर्यंतच आहे. ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ गाणीच लावावीत, असा नियम आहे. पण, पहाटे दीड-दोन काजेपर्यंत काही बार सुरू ठेकले जातात. पोलिसांकडून त्याकर कॉच ठेकून वेळोवेळी कारवाईही केली जाते.

सोलापूर शहर पोलिसांनी दोन परवाने निलंबितही केले आहेत. आणखी दोन बार बंद झाले आहेत. नूतनीकरणावेळी संबंधित तालुक्याच्या पोलिसांकडून वार्षिक अहवाल मागवून घेतला जातो. त्यानंतर त्या बारला नूतनीकरणाची परवानगी मिळते. अनेकदा गाणे लावून काहीजण तेथील नृत्यांगनांशी लगट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच भांडण, हाणामारीही होते. तसेच काही ठिकाणी अश्लील नृत्यही चालते. त्यामुळे आता यापुढे नवीन ऑर्केस्ट्रा बारला परवानगी द्यायचीच नाही, अशी कठोर भूमिका पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतली आहे.

सोलापूर शहरातील ऑर्केस्ट्रा बारचालकांना सक्त ताकीद दिली असून, कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, अशा सूचनाही केल्या आहेत. आता यापुढे नवीन डान्स बार किंका ऑकेस्ट्रा बारला परवानगी दिली जाणार नाही, अशी आमची भूमिका असल्याची माहिती सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता नकीन ऑर्केस्ट्रा बारसाठी परवानगी दिली जात नाही. नवीन बारसाठी एक प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे आला होता; पण त्यास परवानगी दिलेली नाही. सध्या सुरू असलेल्या बारचालकांना नियमांचे काटेकोर पालन करा; अन्यथा परकाने निलंबित होतील, अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.

शहर आणि जिल्ह्यात 14 ऑर्केस्ट्रा बार सुरू

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या जवळपास 14 ऑर्केस्ट्रा बार सुरू आहेत. त्यांच्याकडून नियमांचे तंतोतंत पालन होते की नाही, याची वारंवार पडताळणी केली जात आहे. दरम्यान, आता सांगोला शहरात एक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कोंडी (ता. उत्तर सोलापूर) क मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे प्रत्येकी एक नवीन ऑर्केस्ट्रा बारच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी थांबवला आहे. तर एका नवीन बारचा परवाना पोलिसांनी नाकारला आहे.