सोलापुरात ऊसदराची कोंडी फुटली; शिवसेनेच्या आंदोलनाला यश; साखर आयुक्तांच्या आदेशानंतर जाहीर केला दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सोलापूर जिह्यातील ऊसउत्पादक शेतकऱयांना असलेली ऊसदराची प्रतीक्षा आता संपली आहे. शिवसेनेचे नागेश वनकळसे यांच्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी जिह्यातील सर्व साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे ऊसदर जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिह्यातील 29 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे.

गेल्या दीड ते दोन महिन्यांत सोलापूर जिह्यातील सर्व साखर कारखान्यांनी मिळून 50 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केले आहे. मात्र, त्यांनी ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी कोणताच पुढाकार घेतला नव्हता. त्यामुळे मोहोळ शिवसेनेचे नागेश वनकळसे, तालुकाप्रमुख अशोक भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

यावेळी सी. रंगराजन समितीच्या अहवालानुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नापैकी 70 टक्के रक्कम शेतकऱयांना मिळावी, साखर आयुक्तांनी सोलापूर जिह्यातील कारखान्यांची उसाची एफआरपी त्वरित शेतकऱयांना अदा करण्याचे आदेश द्यावेत, कारखान्याला ऊस गेल्यापासून 14 दिवसांत एफआरपीची रक्कम शेतकऱयांच्या बँक खात्यावर जमा करावी, कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, शेतकऱयांची मागील 2 वर्षांपासूनची थकीत ऊस बिले त्वरित मिळवून द्यावीत, कारखान्याचे वजन काटे ऑनलाइन करावेत आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.

या आंदोलनाची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दखल घेतली आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर संचालक ज्ञानदेव मुकणे यांनी सोलापूर जिह्यातील सर्व साखर कारखानदारांना एफआरपीप्रमाणे ऊसदर जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार सोलापूर जिह्यातील पांडुरंग कारखाना श्रीपूर -2431 रुपये, विठ्ठल गुरसाळे – 2106 रुपये, दामाजी मंगळवेढा -2119, जकराया शुगर वटवटे – 2068, युटोपीयन शुगर- 2116, जय हिंद शुगर -2057, गोकुळ धोत्री – 2018, माऊली शुगर तडवळ – 2084, मातोश्री लक्ष्मी रुदेवाडी – 1951, सासवड माळी – 2291, सहकार महर्षी अकलूज -2320, संत कुर्मदास लऊळ – 2067, संत शिरोमणी भाळवणी – 2152, लोकनेते अनगर – 2281, इंद्रेश्वर बार्शी – 2226, भीमा टाकळी – 2287, विठ्ठल रिफायनरी – 2198, बबनराव शिंदे – 2182, विठ्ठलराव शिंदे -2370, सिद्धनाथ तिऱहे – 2125, सिद्धेश्वर कुमठे – 2118, लोकमंगल भंडारकवठे – 2117, लोकमंगल दारफळ – 2051, भैरवनाथ आलेगाव -2090, मकाई करमाळा – 2323, भैरवनाथ विहाळ – 1908, विठ्ठलराव शिंदे 2 – 2377, विठ्ठल कॉर्पोरेशन – 2198, भैरवनाथ लवंगी – 1961 रुपये या कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे.

ऊसउत्पादक शेतकऱयांनी कारखान्याची पत पाहूनच आपला ऊस गाळपासाठी पाठवा. कारखाना प्रशासन व्यवहाराला चोख नसेल तर त्या कारखान्याला अडकून बसू नका. चांगल्या कारखान्याला ऊस पाठवावा. – नागेश वनकळसे