दिव्यांग मुलांना ग्रहणकाळात मातीमध्ये पुरले, कर्नाटकात अंधश्रद्धेचा कळस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रावरून मंगळावर भरारी घेण्यास सज्ज झालेल्या मानवाला अद्याप अंधश्रद्धेवर मात्र मात करता आलेली नाही. आजच्या सुर्यग्रहणानिमित्त ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. ग्रहणकाळात जमिनीत पुरल्यानंतर व्याधीमुक्त होतील अशा अंधविश्वासापोटी दिव्यांग मुलांना मानेपर्यंत जमिनीत पुरण्याचा निर्दयीपणा कर्नाटकातील एका गावात दिसून आला.  कर्नाटकच्या कलबुर्गीमधील ताजसुल्तानपूर या गावामध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी तीन दिव्यांग मुलांना मानेपर्यंत मातीमध्ये पुरून ठेवण्यात आले होते.