सौर ऊर्जा आणखी स्वस्त, अदानी ग्रीन एनर्जी एसईसीआयला 2.41 रुपये प्रतियुनिट दराने वीज पुरवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱया विजेचा दर दिवसोंदिवस कमी होत असून आता प्रतियुनिटचा दर अडीच रुपयांच्या खाली आला आहे. सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडियाने (एसईसीआय) 1200 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यानुसार अदानी एनर्जीची सहपंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीने 600 मेगावॅटचा हायब्रीड सौर प्रकल्प उभारून त्यामध्ये तयार होणरी वीज पुढील 25 वर्षे एसईसीआयला पुरवण्याचा करार अदानीने केला आहे.

सोलर एनर्जी कार्पेरेशन ऑफ इंडिया ही सरकार कंपनी असून देशांतर्गत सौर ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानुसार एसईसीआयने नुकतेच 1200 मेगावॅटचे दोन सौर प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यापार्श्वभूमीवर अदानी ग्रीन एनर्जीने सौर आणि पवन ऊर्जा असा एकत्रित स्वरूपाचा 600 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्याबाबत टेंडर भरले होते. त्यानुसार एसईसीआयने त्यांचे टेंडर मंजूर करत अदानीला एलओआय दिला आहे. त्यामुळे सौर प्रकल्पात तयार होणार्या विजेचा दर आतापर्यंतचा सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी महावितरणने सौर प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर दिले होते, त्यामध्ये प्रतियुनिटचा दर 2 रूपये 81 पैसे एवढा आला होता, तर एनटीपीसीने सौर प्रकल्प उभारण्यासाठी काढलेल्या टेंडरमध्ये प्रतियुनिट विजेचा दर 2 रूपये 46 पैसे एवढा कमी आला होता.