सर्व्हिस रायफलची गोळी लागली; सुरक्षेसाठी तैनात नौदल जवानाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएस आंग्रेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नौदलाच्या जवानाचा त्याच्याकडील सर्व्हिस रायफलमधील गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. अखिलेश यादव (25) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.अखिलेश हा आयएनएस आंग्रेच्या सुरक्षेसाठी तैनात होता. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तो डय़ुटीच्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्याकडील रायफलीतून सुटलेली गोळी त्याला लागली होती. त्यामुळे गंभीर जखमी अखिलेशला तत्काळ आयएनएचएस अश्विनी या नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी अखिलेशला मृत घोषित केले. अखिलेशने आत्महत्या केली की चुकून गोळी सुटल्याने ती लागून त्यात त्याचा मृत्यू झाला याबाबत मुंबई पोलीस व नौदल अधिकाऱयांकडून तपास होत असून तपासाअंती खरे कारण स्पष्ट होईल असे नौदलाच्या वतीने सांगण्यात आले.