
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. हिंदुस्थानी सैन्यात असलेल्या जवानाच्या पत्नीनेच आपल्या पतीला लैंगिक सुख मिळवण्याच्या बहाण्याने विषारी मलम दिले. हा मलम लावल्यामुळे जवानाच्या गुप्तांगाला इजा झाली असून या प्रकरणी पत्नीला आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जवान सुटी घेऊन आपल्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर आपल्या पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यापूर्वी पत्नीने जवानाला एक मलम दिले आणि त्यामुळे लैंगिक सुख अधिक मिळेल असे आमिष दाखवले. हे मलम लावल्यानंतर जवानाला त्रास होऊ लगाला आणि तो आजारी पडला. काही दिवसानंतर जवानाने डॉक्टरांकडे धाव घेतली
जवानाने दिलेल्या माहितीनुसर डॉक्टरांनी सांगितले की तो मलम विषारी आहे आणि ते शरीराला घातक आहे. तसेच हा मलम लावल्यानंतरही जवान इतके दिवस जिवंत कसा काय राहिला यावर डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले. यानंतर जवानाला आपल्या पत्नीबद्द्ल संशय वाटला आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी जवानाची पत्नी आणि त्याच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. परंतु अजूनही दोघांपैकी एकालाही अटक केलेली नाही. पत्नी आपल्या माहेरी गेली असून तिचा प्रियकर फरार आहे. तसेच नेमके जो मलम जवानाने लावले होते तेही पोलिसांना सापडले नाही. ते लोशन सापडल्यानंत त्याची फॉरेन्सिक चाचणी केली जाईल.































































