लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं आज कोलकाता येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. चॅटर्जी हे किडनीच्या आजारापासून त्रस्त होते. त्यावर उपचारासाठी म्हणून ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी डायलिसिसवर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं.

माकपतर्फे तब्बल १० वेळा ते लोकसभेवर निवडून आलेले आहेत. सध्या ते लोकसभेत अपक्ष खासदार आहेत. अमेरिका-हिंदुस्थानमध्ये झालेल्या अणुकरारावरून माकपने काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यावेळी त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची माकपमधून हकालपट्टी झाली होती.

summary: Ex-Speaker somnath chatterjee passed away