मृत आई वडिलांच्या आत्म्याला बोलवण्यासाठी तो रात्रभर नग्न होऊन नाचला

63
black-magic

सामना ऑनलाईन । चंदिगढ

मृत आई वडिलांच्या आत्म्याला बोलविण्यासाठी एक तरुण त्याच्या मित्रांसोबत भर चौकात नग्न होऊन रात्रभर नाचत राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यात ही घटना घडली असून पोलिसांनी त्या तरुणाला व त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे. या तरुणाच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे.

ऊना जिल्ह्यातील दौलतपूर गावात राहणाऱ्या या तरुणाच्या वडिलांचे १२ दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या सर्व विधी झाल्यानंतर त्यांच्या मुलाने वडिलांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी माता की चौकीचे आयोजन केले होते. घराबाहेर गार्डनमध्ये माता की चौकी आयोजित करण्यात आली होती. पूजा वगैरे सर्व पार पडल्यानंतर सर्व नातेवाईक घरा गेले त्यानंतर सदर तरुण त्याच्या मित्रांसोबत तेथे दारू प्यायला बसला. त्यांचा दारू पिऊन धिंगाणा सुरू असतानाच अचानक त्यांनी कपडे काढले व नग्न होऊन नाचायला सुरुवात केली. आजुबाजुच्या लोकांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला. मात्र मी आई वडिलांच्या आत्म्याला बोलविण्यासाठी असा नाचत असल्याचे त्या मुलाने शेजारच्यांना सांगितले. बराच वेळ हा तमाशा न थांबल्याने शेजारच्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी त्याला व त्याच्या मित्रांना अटक केली. त्या सर्वांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतरही विचित्र बडबड करत होते. मात्र सकाळी जेव्हा दारूची नशा उतरली तेव्हा त्यांना काय झाले ते समजले.

आपली प्रतिक्रिया द्या